Home पुणे आमच्याच महापुरूषांना बदनाम करायचं आणि…; राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

आमच्याच महापुरूषांना बदनाम करायचं आणि…; राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आज मनसेला 16 वर्षे पू्र्ण झाली असून याच पार्श्वभूमीवर मनसेचा वर्धापनदिन सोहळा आज पुण्यात पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास जुन्या शैलीत भाषण केलं. यावेळी बोलताना राज यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. तसेच राज यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वादग्रस्त विधानावरही भाष्य केलं.

राज्यपालांची नक्कल करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचार राज ठाकरे यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला.

हे ही वाचा : भाजपला धक्के सुरूच; या ‘दोन’ नगरसेवकांनी दिले राजीनामे; राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

हे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तुम्हाला जातीत गुंतवून ठेवत आहेत. शिवाजी असं नुसतं नाव ऐकू आलं की हा माणूस उठून जायचा, काहीतरी सापडेल या आशेने, असे म्हणत हे परवा आमचे राज्यपाल. काहीसमज बिमज आहे का ? मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, बघितलं ना कसंय ते? असे म्हणत थोड मागे झुकत, वाकडं होत राज ठाकरेंनी राज्यपालांची हुबेहुब नक्कल केली. त्यानंतर राज यांनी त्यांच्या जुन्या शैलीत राज्यपालांना खडेबोल सुनावले.

आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यापालांवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या?; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

“पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, खंद्या समर्थकानं घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

 ‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर…’; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान