आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रायगड : किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण असून मोठ्या प्रमाणात शिवभक्त पहायला मिळत आहे.
शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
हे ही वाचा : “किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात; आदित्य ठाकरेंसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती”
अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय आला. त्यानंतर अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं. बाळासाहेब थोरात काय, दिलीप-वळसे पाटील आणि मी असेल, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आरक्षण खोळंबून ठेवायला आम्हाला काय आनंद वाटतो का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही कायद्याच्या अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत, असं अजित पवार यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खडसावलं.
महत्वाच्या घडामोडी –
कोलईत शिवसैनिक जमले होते, पण त्यांनी मला पुण्यासारखं मारलं नाही- किरीट सोमय्या
“राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”