“आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; विरारमधील शिवसैनिकांचा महादेवाला रक्ताचा अभिषेक”

0
488

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना खंबीरपणे पाठीशी असल्याचे दाखवण्यासाठी विरारमध्ये शिवसैनिकांनी चक्क रक्ताचा अभिषेक घातला आहे.

विरार पूर्व स्टेशन जवळील शिवसेना शाखेच्या बाजूच्या शंकराच्या पिंडीवर बोटाला सुया टोचवून रक्त काढून हा अभिषेक घालण्यात आला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना या नावाने घोषणा देत या शिवसैनिकांनी आपली एकनिष्ठता दाखवून दिली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेशी गद्दारी करणारे बंडखोर नव्हे तर हरामखोर, आता तर ते आता माझे वडीलही चोरायला निघाले आहेत”

हर हर महादेवचा गजर यावेळी करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आम्ही आजन्म राहणार, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या महिला शिवसैनिकही होत्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरे देशाचे यशस्वी नेतृत्व करतील, या भितीनेच भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ आमदाराचा दावा

मनसे म्हणजे एका आमदाराची…; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा टोला

“मोठी बातमी; शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेला ‘हा’ नेता पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here