आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा सुनावणी सूरू असून त्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. 14 मार्चला ही सुनावणी पुन्हा सूरू होणार आहे. यारून ठाकरे गट-शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सूरू असतानाच 14 मार्चला सरकार पडणार, अशी टीका विरोधकांकडून होत असून यावर आता शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमच्यापैकी एकानंही उद्धव ठाकरेंना राजीनामा मागितलेला नाही. गद्दारी कशाला म्हणतात? जर आपण आपली तत्व सोडली तर त्यावा गद्दारी म्हणतात. ती गद्दारी कुणी केली? तत्व त्यांनी सोडली आहेत. आम्ही नाही सोडली. पण आम्ही कधी त्यांना गद्दार म्हटलेलं नाही, असं केसरकर म्हणाले. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा : “…तर भाजप, मनसेशी हातमिळवणी करण्यास तयार; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”
“आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल आदर असल्यामुळे आम्ही काही बोलत नाहीये. त्याचा गैरवापर आदित्य ठाकरे करून घेत आहेत. वाट्टेल तसं बोलत चालले आहेत. योग्य वेळी त्यांना उत्तर देण्याची गरज आहे. महाराष्ट्राची जनताच त्यांना उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया केसरकरांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“येणाऱ्या काळात सगळ्या महापालिकेंवर मनसेची सत्ता असणार म्हणजे असणारच”
…म्हणून मनसेच्या नादाला लागायचं नाही; राज ठाकरेंचा भाजपच्या ‘या’ खासदाराला इशारा
आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….