आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 13 आमदारांसह गुजराथमध्ये तळ ठोकून आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकानाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.
हे ही वाचा : शिवसेनेला मोठा झटका! एकनाथ शिंदेंसह 13 आमदार नॉट रिचेबल
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता कार्यकर्ते आणि पदाधिकारीही नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे हेही नॉट रिचेबल झाले आहेत.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
“योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार; पुढील 2 महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार”
विधान परिषद निवडणूक निकाल! भाजपाचे पाच उमेदवार विजयी, तर काँग्रेसला मोठा धक्का
MLC Elections 2022! शिवसेनेच्या दोन्ही शिलेदारांचा विजय, राज्यसभेचा वचपा काढला”