मुंबई : संपूर्ण राज्यात कोरोनाचे लसीकरण वेगाने सुरू आहे. ब्रिटन, ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असुन मृत्यु होत आहेत. यामुळे आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरू केलं असलं तरी आरोग्याचे नियम पाळले पाहिजेत. आपण महाराष्ट्रात काही व्यवहार सुरू केलं असलं तरी सर्व निर्बंध आपण उठवणार नसून काळजीपूर्वक जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
“तात्या विंचूला जीवनदान देणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड”
“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”
अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली- निलेश राणे
“नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा”