आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. दृश्यप्रणालीद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
हे ही वाचा : ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची
मुंबई महापालिकेत पण जरा कुठं खुट्टं झालं की, लगेच महापालिकेला धारेवर धरलं जात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं सोपं असतं. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
◆कोस्टलरोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?◆ मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले? ◆मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात,आम्ही ते विचारत राहू! कारण…प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही???, असा प्रतिटोला आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.
◆कोस्टलरोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?
◆ मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले?
◆मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले?असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात,आम्ही ते विचारत राहू!
कारण…
प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही???
4/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 15, 2022
महत्वाच्या घडामोडी –
नावात राष्ट्रवादी असल्यानं पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला
मला आता चंद्रकांत पाटलांशी बोललंच पाहिजे; जयंत पाटलांचा टोला