मुंबई : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करायचं आहे. आपल्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे, असा भाजपने दावा केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागा आहेत. बहुमतासाठी 150 जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे त्यांचे 105 आमदार आहेत. त्यामुळे आता त्यांना आणखी 40 आमदारांची आवश्यकता आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या 54 आमदारांची यादी दिली आहे. ते त्यांचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून ही संख्या 159 होतेय. त्याशिवाय आणखी काही आमदारांचा पाठिंबा भाजपला मिळू शकतो, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.