जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला.
राम जन्मोत्सव हा आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. गेल्या 500 वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
राम मंदिराच्या आंदोलनामध्ये मी देखील सहभागी होतो. त्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यात सर्वांचे योगदान आहे. आज त्या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. राम मंदिराच्या आंदोलनासाठी मी देखील 15 दिवस जेलमध्ये काढले. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
राममंदिराच्या भूमीपूजनानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
राम जन्मभूमिचा संघर्ष कधीही न विसरता येणारा- मोहन भागवत
“संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली”
500 वर्षांची प्रतीक्षा संपली; योगी आदित्यनाथ व्यक्त केल्या भावना