“शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत”

0
375

पुणे : शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत, असा सल्ला नगरसेवकांना देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. पुण्यातील एका विकास कामाच्या उद्घाटन समारंभात चंद्रकांत पाटील बोलत होते.

निवडणुकीआधी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळा, सर्व कामं करा. काही कामं राहात असतात मात्र, ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखं करु नका. निवडणुकीआधी आश्वासन द्यायचं आणि पुन्हा विसरायचं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसनेला टोला लगावला आहे.

शिवसेनेनं निवडणुकीआधी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देऊ म्हणणाऱ्या शिवसेनेने करोना काळात अवाढव्य वीजबिलं दिली, शिवाय वाहून गेलेल्या घराला अडीच हजारांचं वीजबिल दिलं. अशी शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे”

अनेकजण डोळे लावून बसले होते, पण…; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच- छगन भुजबळ

“ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाची पावती सोनिया गांधीनीच दिली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here