Home महाराष्ट्र “पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी युती नको, स्वबळावर सत्ता मिळवू”

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी युती नको, स्वबळावर सत्ता मिळवू”

मुंबई :  आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत कोण असेल, कोण नसेल याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे साथ देत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंच्या शिवसंग्राम, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश होतो. याशिवाय आणखी काही छोटे पक्ष सोबत आहेत. मात्र काही जणांची स्थिती नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता टीका केली आहे.

56 आमदार असताना त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचे नाव घेतले तर सर्वात आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल आणि बहुमताने सत्ता स्थापन करेल. आता आम्हाला कोणासोबतही युती नको, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी स्वबळाची घोषणा केली.

महत्वाच्या घडामोडी –

लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

महाराष्ट्र बंदिवान केल्याचा रेकॉर्ड उद्धव ठाकरेंच्या नावावर- आशिष शेलार

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; ‘या’ भाजप खासदारचा दावा

“शिवसेना स्वतःचा नालायकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष”