कराड : आम्ही कोणालाही झटके देत नाही. अनेकजण शिवसेनेत यायला तयार आहेत, असं वक्तव्य शिवसेना नेते व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुशिवसेनेची वाढ होत आहे. शांत आणि संयमी स्वभावाने उद्धव ठाकरे यांनी वर्षभर राज्याचा कारभार हाताळला आहे. त्यामुळेच अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं. तसेच राज्य सरकारने राज्यात नाईट संचारबंदी लागू केली आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. यावरही शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, दरेकरांनी 4 दिवसांच्या वर्तमानपत्रातील बातम्या बघायला हव्या होत्या. यूरोपीयन देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. या नव्या कोरोनाचा फैलावण्याचा वेग अधिक असून हा कोरोना जीवघेणा आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे कोणताही कहर नाही. जनतेच्या संरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आहे, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी दरेकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”
भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांचा टोला
“अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण”
“…अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही”