फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांना टोला

0
185

सोलापूर : दुधाला वाढीव अनुदान आणि दर देण्याची मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पुन्हा एकदा सोलापुरात आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष यांच्यावर देखील राजू शेट्टी यांनी यावेळी निशाणा साधला. तर सदाभाऊ खोत यांच्यासोबत येण्याच्या चर्चावरुन राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली.

काही दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेच्यावतीने देखील दूध दर संदर्भात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. वेगवेगळी आंदोलन करण्यापेक्षा एकत्रित येऊन आंदोलन का केलं जात नाही असा प्रश्न पत्रकरांनी विचारला त्यावरून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली. फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही, असा जोरदार टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला.

दरम्यान, सध्या माझ्यासमोर केवळ दूध दराचा मुद्दा आहे. त्यानंतर आमदारकीचा विचार करु, अशी प्रतिक्रिया देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी-

लवकरात लवकर वाहतूक चालू करा, मंदिरं सुरू करा नाहीतर…; प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा

मनसे शहराध्यक्षांच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट; कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

…नाहीतर राजीनामा द्या; भाजपच्या ‘या’ नेत्याचे नवाब मलिकांना आवाहन

“मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here