Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही; नाना पटोलेंचा टोला

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही; नाना पटोलेंचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : किरीट सोमय्या यांच्याकडून होत असलेल्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील हे मास्टरमाइंड असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही वेळेपूर्वीच पत्रकार परिषदेत केला. यांनतर लगेच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.

मुश्रीफ यांनी घोटाळ्याच्या मुद्द्यावर बोलावे. ते या मुद्द्यावर बोलूच शकत नाही. अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन भाजप केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना, आमदारांना लक्ष्य करत आहेत. मात्र काँग्रेसच्याही दोन नेत्यांचा प्रताप आम्हाला माहिती पडला आहे. दोन दिवसात त्यांचेही प्रकरण पुढे येणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेस चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याला गांभिर्याने घेत नाही. तसेच आमच्या मंत्र्यांची चूक नसल्यानं आम्हाला घाबरायची गरज नाही, असं जोरदार प्रत्युत्तर नाना पटोले यांनी यावेळी दिलं. तसेच भाजप लोकांची दिशाभूल करत असून लोकांची समस्या सोडवत नसल्याचंही पटोले यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आवाज येईल, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नको- सुधीर मुनगंटीवार

“परभणीत शिवसेनेला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

शरद पवारांमुळे अजित पवारांना संधी मिळाली पण, त्यांनी ती…; निलेश राणेंची टीका

राष्ट्रवादी-शिवसेनेचे 14 नगरसेवक फुटणार! भाजपाचा मोठा दावा