मुंबई : कर्नाटक नंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यावर पवार कुटुंबिय आणि पक्षांत उभी फूट पडली आहे. अशातच राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवारांना पाठींबा माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे अमरनेळचे आमदार आनिल पाटील यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
सरकार भाजप आणि राष्ट्रवादीचे स्थापन होणार आहे. काँग्रेसने एक महिन्यांपासून घोळ चालवीला होता. काँग्रेसची दररोज एक अपेक्षा वाढत होती. म्हणून सकाळी निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आमदारांच्या हजेरीसाठी त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. मात्र त्याचा दुरुपयोग करण्यात आला. तेच सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठिंबा पत्र म्हणून सादर करण्यात आलं, असा आरोप नवाब मलीक यांनी अजीत पवारांनर केला आहे.