Home महाराष्ट्र “आम्ही छत्रपतींचे वंशज आहोत औरंगजेबाचे नाही, त्यामुळे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ व्हायलाच पाहिजे”

“आम्ही छत्रपतींचे वंशज आहोत औरंगजेबाचे नाही, त्यामुळे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ व्हायलाच पाहिजे”

औरंगाबाद : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज. औरंगजेबाचे नाही, त्यामुळे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ व्हायलाच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायासयात एक याचिका दाखल आहे. त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनाचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. आता ते मुख्यमंत्रीही झाले आणि मुलालाही मंत्री केले. मात्र, यासाठी ते मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकार करणार 1 लाख 1 हजार पदांची मेगाभरती !

…म्हणून बाळासाहेबांनी इंदिरा गांधीजींशी मांडवली केली; निलेश राणेंच बाळासाहेब ठाकरेंवर टिकास्त्र

सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली याची माहिती समोर आली पाहिजे

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनावर निशाणा; म्हणतात…