“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

0
400

अमरावती : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अमरावतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

आमचा कारभार उत्तम सुरू आहे. आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करत आहोत. त्यामुळे विरोधकांनी लावालावी करू नये, असं म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटलांनी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने वारंवार पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर गेले होते, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच आज देशातील सर्व शेतकऱ्यांची सहानुभूती दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. मात्र हे आंदोलन बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप यावेळी जयंत पाटलांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली- निलेश राणे

“नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा”

“शर्जिलला बेड्या पडतीलच! निश्चिंत रहा, हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या”

पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात, हे लोकांना माहितीय; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here