राज ठाकरेंना ओळखत नाही म्हणून वॉचमनला मारहाण?;अभिनेत्रीची गुंडगिरी

0
1102

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ओळखत नाही म्हणून चित्रपट अभिनेत्रीने वॉचमनला मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे, अभिनेत्रीला नोटीस बजावली आहे. संबंधित अभिनेत्री मनसेची कार्यकर्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना मुंबईच्या मढ परिसरातील आहे. या अभिनेत्रीने बंगल्याचा सुरक्षारक्षक दयानंद गौड याला राज ठाकरे यांचा फोटो दाखवून ‘हे कोण’ विचारले. सुरक्षारक्षकाने ‘मी ओळखत नाही’ असं सांगितले. त्यामुळे चिडलेल्या अभिनेत्रीने सुरक्षारक्षकांला मारहाण केली!

हे ही वाचा : “ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिप्ट; दिवाळीनंतर 1 डोस झालेल्यांना सर्वत्र फिरण्याची मुभा?”

मराठी दिग्दर्शक, निर्माते आणि एक मराठी अभिनेत्री शूटिंगचे ठिकाण पाहण्यासाठी मढ़ येथील एका बंगल्यात गेले होते, तिथे सुरक्षा रक्षकाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो पाहून त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यानंतर अभिनेत्रीने सुरक्षारक्षकाला चापट मारली. याबाबत पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा चुकीचा आहे, अशी माहिती चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिली.

दरम्यान, या घटनेबद्दल मालवणी पोलिसांनी सांगितले की अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईतील मढ परिसरात असलेल्या बंगल्यात जाऊन सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैशांची मागणी करत होते. पोलिसांनी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. अभिनेत्रीला नोटीस दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची खेळी; एकाच पक्षातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभारणार

“शरद पवार जेंव्हा संसदेत होते, त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते”

भाजपने बेईमानी केली नसती, तर उद्धव साहेबही बेईमान झाले नसते- गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here