मुबई : आजपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. या जन आशीर्वाद यात्रेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय.
‘आधी केलेले पाप धुऊन काढा, मगच आशीर्वाद मागा’, असा मजकूर असलेले अनेक बॅनर्स राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत.
एकीकडे महागाईने कळस गाठलेला असतानाच भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजपच्यावतीने महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागितला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, इंधनाचे दर गगनाला भिडत असताना जनतेचा आशीर्वाद कोणत्या तोंडाने मागितला जात आहे? असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री हे संकट मोचन, अनेक संकटे येऊनही ते उत्कृष्ट काम करत आहेत”
2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्तेत आणू- देवेंद्र फडणवीस