आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. ठिकठिकाणी पक्षाची ताकद वाढण्यासाठी नेतेमंडळींनी कंबर कसली असून फोडाफोडीच्या राजकारणालाही सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पक्षाचे कल्याण प. विधानसभा कार्याध्यक्ष उदय गणपत जाधव यांच्या पुढाकाराने 260 महिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : “मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचं भांडवल करणं हे भाजपच्या नेत्यांना चांगलं जमतंय”
चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कल्याण-डोंबिवली जिल्हा आढावा बैठक पार पडली. आगामी काळातील निवडणुका, बुथ कमिट्या बाबत सर्वांशी चर्चा करून आढावा घेतला.
दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदार जगन्नाथ शिंदे, निरीक्षक मायाताई कटारिया, जिल्हाध्यक्ष सारिका ताई गायकवाड, विद्याताई वेखंडे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
नितेश राणे स्वत: थकबाकीदार, ते बँक काय चालवणार; शिवसेनेचा हल्लाबोल
कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्ट्राचार उघड करावा- रावसाहेब दानवे
भाजपा नेत्यांच्या बेनामी संपत्तीचे पुरावे विधानसभेत सादर करणार; नवाब मलिकांचा गैाप्यस्फोट