सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, लवकरच….; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ!

0
7

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. आता राज्यात कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेण्यात आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलय.

मित्रपक्षांबरोबर काम करणं मला अवघड झालंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहांना सांगितल्याचा दावा राऊतांनी केलाय. तसेच सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, असं म्हणत लवकरच काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत राऊतांंनी दिले आहेत.

दरम्यान, राऊत आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. हे सरकार कलंकीत झालेलं आहे. मी खात्रीने सांगतो की मंत्र्‍यांना जावे लागेल. वसईच्या आयुक्तांवर धाड पडलेली आहे. हे 1000 कोटींचं प्रकरण आहे. या प्रकरणात एका मंत्र्‍यांना जावं लागेल. नव्या क्रीडामंत्रींना योग्य खाते मिळाले आहे. त्यांनाही जावे लागेल, असा मोठा दावा राऊत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here