पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत मतदान जागृती हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध मतदान जागृती विषयक घोषवाक्ये, चित्र रंगभरण, पोस्टर्स याद्वारे मतदानाचे महत्व सांगून पालकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सदर उपक्रमाचे नियोजन उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांनी केले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत हे बहुमूल्य आहे. लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे आणि मतदानाचा टक्का वाढावा या हेतूने सदर उपक्रम घेण्यात आल्याचे मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी सांगितले.

