आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज बोलताना देगलूर-बिलोली निवडणूकीविषयी भाष्य केलं आहे.
कोणाच्याही नादाला न लागता पंजाला मतदान करा, शेवटी तुमची कामे मीच करणार आहे, असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक 30 ऑक्टोबरला होणार असून याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची सभा देगलूर-बिलोली येथे आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत ते बोलत होते.
हे ही वाचा : मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन; पुण्याचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईकडे रवाना
लोकसभा निवडणुकीत तुमच्या गावातून मी मागे होतो. रावसाहेब अंतापूरकर मात्र 110 मतांनी लीडवर होते. मला मत दिले नाही, म्हणून मी तुमच्यावर नाराज नाही. पण आता ती चूक पुन्हा करू नका. कोणाच्याही नादाला न लागता पंजाला मतदान करा, शेवटी तुमची कामे मीच करणार आहे. तुमच्या कामांची यादी माझ्या खिशात आहे. मतपेटी उघडली की ही चिठ्ठी बाहेर काढणार, असं अशोक चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सूरूच; भंडाऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”
शिवसेनेशी लढण्यासाठी भाजपा राज ठाकरेंचा वापर करत आहे; शिवसनेचा आरोप
निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र