“कर्णधार म्हणून विराट कोहलीच; कर्णधारपदाच्या संभाव्य चर्चेवर बीसीसीआयचं स्पष्टीकरण”

0
314

मुंबई : आयसीसी वर्ल्ड टी 20 नंतर विराट कोहली टी -20 आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

टीम इंडियाचा वन डे आणि टी 20 संघाची धुरा विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवले जाण्याचे वृत्त नुकतंच काल प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आलं होतं. यावर BCCI चे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपूत्र जय शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या संघ जी कामगिरी करत आहे, ती चांगली होत ​​आहे. त्यामुळे कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या बातम्या निराधार असल्याचं जय शहा यांनी यावेळी म्हटलं आहे. ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंची ‘ती’ सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंमलात आणणार; पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश”

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात माॅडेल?”

बलात्काऱ्याला आमच्या ताब्यात द्या, इथं न्याय होणारच! मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या

राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली; बावनकुळेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here