दुबई : आजच्या राजस्थान रॉयल्सने विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सनी पराभव केला.
राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. राजस्थानकडून महिपाल लोमरुरने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर अखेरच्या काही षटकात राहुल तेवतिया आणि जोफ्रा आर्चरने फटकेबाजी केली. राहुल तेवतियाने 12 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. तर जोफ्रा आर्चरने नाबाद 16 धावा केल्या. तर बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर इशुरू उडाणाने 2, तर नवदीप सैनीने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरूवात धमाकेदार झाली. फिंच व पडीक्कलने 2.5 षटकात 25 धावांची सलामी दिली. पण फिंच श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर बाद झाला. फिंचने केवळ 8 धावा केल्या. नंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली व देवदत्त पडीक्कलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. नंतर पडीक्कल जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. पडीक्कने 45 चेंडूत 63 धावा केल्या. तर सुपर वी विराट कोहलीने 53 चेंडूत 72 धावा केल्या.
राजस्थानकडून जोफ्रा आर्चर व श्रेयस गोपाळने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
राजस्थान रॉयल्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 155 धावांचे लक्ष्य
राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
उत्तर प्रदेश पुन्हा बलात्कारानं हादरलं; मेरठमध्ये 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र