लोखंडी बॅरिगेट्स ओलांडून विराटचा फॅन सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा देऊन मैदानात

0
180

इंदूर : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीचा एक फॅन सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा देऊन मैदानात घुसला. लोखंडी बॅरिगेट्स ओलांडून तो थेट विराटकडे पोहोचला.

ड्रिंक्स ब्रेकदरम्यान एक फॅन विराट कोहलीच्या जवळ त्याच्या पाया पडण्यासाठी मैदानात गेला.सुरक्षा रक्षक त्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोहोचले असताना कोहलीने त्यांना रोखलं. त्याने आपल्या या फॅनच्या गळ्यात हात टाकला आणि सुरक्षा रक्षकांना त्याला व्यवस्थित बाहेर घेऊन जाण्यास सांगितले.

भारताने बांगलादेशचा पहिल्या टेस्ट सामन्यात एक इनिंग आणि 130 रनने पराभव केला. २ सामन्यांच्या या सिरीजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट सेनेने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला.

दरम्यान, कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर 22 नोव्हेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यात दूसरा आणि शेवटचा टेस्ट सामना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here