Home महाराष्ट्र दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट- नवाब मलिक

दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट- नवाब मलिक

मुंबई : दिल्लीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीने संपुर्ण देशातील वातावरण तापलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

2 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. हा मोर्चा दिल्लीत आला. त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला. पण तिरंगा काढून त्यांनी ध्वज फडकवला ही बातमी चुकीची आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, लाल किल्ल्याच्या दिशेने शेतकऱ्यांची रॅली गेली होती. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता. तिथे ध्वज फडकवण्याचं काम भाजपशी संबंधित दीपसिंह सिद्धूने केली. याच दीपसिंह सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असं म्हणत दिल्लीतील हा हिंसा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम; अमोल मिटकरींचा टोला

BCCI अध्यक्ष साैरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; रूग्णालयात केलं दाखल

दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत

केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे- अण्णा हजारे