“महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत”

0
276

मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महिलांवरील अत्याचारांच्या घटानांवर भाष्य केलं आहे

जे कोणी आरोपी असतील त्यांना उचला, आणा, फटकावायचं तर फटकवा आणि तातडीने त्यांच्यावर केस दाखल करा. या आरोपींना तातडीने शिक्षा केली गेली पाहिजे हा सरकारचा आग्रह आणि निग्रह आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी कायदे केले तसा कायदा आणायचा का? नेमका तो कायदा कसा आणायचा याबाबत अभ्यास सुरू आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा वार्षिक पुरस्कार सोहळा आज पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणतात…

लाज वाटायला हवी तुम्हाला; अभिनेते प्रकाश राज भाजपवर कडाडले

भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो, मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का बसलाय

त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं अशक्य होईल; जयंत पाटलांचा आशिष शेलारांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here