निलेश राणे यांनी केली विनायक राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट

0
322

मुंबई : नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली. त्या नारायण राणेंनी ती सावरता येते का हे पाहावं, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत विनायक राऊत यांच्यावर टिका केली आहे. या ट्वीटमध्ये काही लोकांनी विनायक राऊत यांना पकडल्याचं दिसून येतंय. यावर आज कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला आहे, असं कॅप्शन निलेश राणे यांनी दिलं आहे.

नारायण राणे यांनी मेट्रोच्या कामावरुन शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टिका केली होती.

दरम्यान, निलेश राणे यांनी टीका करताना अनेकवेळा राजकिय नेत्यांबाबत अरे-तुरे या भाषेचा प्रयोग करताना पहायला मिळालं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

इंग्लंडच्या खेळाडूंनी केली पाकिस्तानची धुलाई; एकाच सामन्यात इंग्लंडच्या दोन फलंदाजांंची शतकी खेळी

“संधी मिळताच जनता पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवते”

स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज होणार स्वस्त; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो पण आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here