सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. त्या 79 वर्षाच्या होत्या. सातारा येथे माझी आई काळूबाई या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
सातारा येथील प्रतिभा रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले 5 दिवस त्या रूग्णालयात कोव्हिड अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होत्या, परंतु त्यांच्या शरीराने उपचारास साथ दिली नाही, अशी माहिती रूग्णालयाने दिली.
दरम्यान, माझी आई काळूबाई या मालिकेचं शूटिंग सातारा येथे सुरू होते. तेथील सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात आशालतांचाही समावेश होता.
महत्वाच्या घडामोडी-
“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर रोमहर्षक विजय “
मराठा आरक्षण कुणाला नकोय?, त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे- अशोक चव्हाण
शिवसेना हा अत्यंत कन्फ्युज पक्ष; देवेंद्र फडणवीसांची टीका
धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र