आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आल्यानंतर मोरे पक्ष सोडणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र त्यानंतर मोरे यांना अनेक पक्षांकडून ऑफर येत असतानाच ठाण्याच्या सभेत वसंत मोरे हजर राहिले आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.
राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचे आवाहन केलं होतं. 3 मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आंदोलनही केलं होतं. मात्र मोरे हे यापासून दूर असल्याचं पहायला मिळालं. यामुळे मोरे पुन्हा पक्ष सोडणार, अशा चर्चा सूरू झाल्या. यावरून आता मोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “भंडारा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; 7 पैकी 4 पंचायत समित्यांवर मारली बाजी”
“मी आजारी आहे, मी पक्ष सोडणार, अशा चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. पण असं काहीच नाही. पक्षातील काही असंतुष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की मी पक्षातच आहे आणि अशा लोकांपासून पक्षाला धोका असल्याचे आपण राज ठाकरे यांच्या कानावर घातलं आहे, असं मोरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर…;ओबीसी आरक्षणावरुण देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर आरोप
कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन् हे गॅलरीत ये जा करतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरेंनी नेहमी आपल्या भूमिका बदलल्या, त्यांच्या भोंग्याचा आता ठेंगा झाला- गुलाबराव पाटील