“वारिस पठाण यांचं वक्तव्य मुस्लिम समाजालाही मान्य नाही”

0
417

मुंबई : आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत, असं  वादग्रस्त विधान एमआयएमआयएमचे नेते आणि वारिस पठाण यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.

भाजपच्या सांगण्यावरून असली विधानं करायची. आणि इथलं वातावरण दुषित करायचं हे मुस्लिम समाजालाही मान्य नाही. त्यामुळे हे वाक्य कोणत्या हेतुने अलं आहे हे न समजण्या इतका महाराष्ट्रही मुर्ख नाही, आरोप जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे.

यांच्यासारख्यांना समाजातूनच हाकलून दिले पाहिजेत. ही लोकं मुस्लिम समाजाचं हित बघत नाहीत तर मुस्लिम समाज कसा बुडेल याच्याकडे यांचं लक्ष आहे, असं म्हणत त्यांनी वारिस पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही पठाण यांचं हे विधान अत्यंत चुकीचं आहे, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर पवारांची औलाद सांगणार नाही- अजित पवार

आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत; एमआयएमच्या नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

…म्हणून नारायण राणेंचा जळफळाट होत आहे- विनायक राऊत

“अजितदादा इतके वर्ष आपण उगाच दूर होतो”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here