गोपाळकृष्ण शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांनी कलागुणांचे केले सादरीकरण

0
83

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेत ७७ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समूहगीत, देशभक्तीपर गीतांवर नृत्य, भाषणे या विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. संदेश भारस्कर या विद्यार्थ्यांने हार्मोनियमवर देशभक्तीपर गीत वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

तत्पूर्वी सदर कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अँड. निलेश निकम प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मकर संक्रांती सणानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमातील विजेत्या महिला पालकांना बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापिका जयश्री कासार, गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे, दिप्ती भगत उपस्थिती होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here