Women’s Day 2026 : गोपाळकृष्ण शाळेत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

0
55

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील महिला पालकांसाठी विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यामध्ये निबंधलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये हिरारीने सहभागी होत महिला पालकांनी क्रमांक पटकावले.

यामध्ये सर्वप्रथम रांगोळी स्पर्धेत प्रथम मंदा ढाले, द्वितीय सारिका कोळेकर, तृतीय कोमल ढावरे, निबंध लेखन स्पर्धेत प्रथम अर्चना जाधव, द्वितीय उज्वला सकटे , तृतीय पौर्णिमा वायदंडे,वक्तृत्व स्पर्धेत प्रथम भाग्यश्री गेजगे, द्वितीय भारती भारस्कर, तृतीय शिल्पा जाधव, मनोरंजनात्मक स्पर्धेत प्रथम नकूशा धोत्रे, द्वितीय स्वाती वाघमारे, तृतीय प्राजक्ता कुसाळकर आदी महिला पालकांनी क्रमांक पटकावले.

यावेळी फुलोरा फाऊंडेशनच्या प्रीती शिरोडे, पी डी सी सीबँकेच्या गोखलेनगर शाखेच्या बँक व्यवस्थापक कल्पना बल्लाळ, बालभारती पाठ्यपुस्तक भांडार अधिक्षक कामिनी प्रभुणे, बालभारती पाठ्यपुस्तक भांडार व्यवस्थापक संगीता रावडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. आजच्या या धावपळीच्या जीवनात मुले जंक फूड, फास्ट फूड असे चटकदार पदार्थ वारंवार खातात. यामुळे मुलांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे पालकांनी नियमितपणे मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे असा मोलाचा सल्ला फुलोरा फाऊंडेशनच्या प्रीती शिरोडे यांनी यावेळी सर्व महिला पालकांना दिला.

सदर उपक्रमाची संकल्पना उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भगत यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे आणि विशाल चव्हाण आणि महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here