आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भारतातील सर्वात अत्याधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चक्क रस्ता चुकल्याचं माहिती समोर आली आहे. ही ट्रेन गोव्याला निघाली होती, मात्र ती कल्याणला पोहोचल्याचं समोर आलं आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन गोव्याला जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून सुटली, त्यानंतर तिला निर्धारीत मार्गानं दिवा स्टेशनवरून पनवेलकडे जायचे होते. मात्र ती कल्याणच्या दिशेनं पुढे गेली. ही घटना सकाळी 6 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास घडली.
ही बातमी पण वाचा : रामदास आठवले महायुतीवर नाराज? म्हणाले, “मी आणि माझे कार्यकर्ते…”
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार सिग्नल यंत्रणेमध्ये निर्माण झालेल्या गडबडीमुळे झाला. दिवा जंक्शनच्या डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईनमधध्ये असलेल्या एका सिग्नलमध्ये आणि दूरसंचार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.
दरम्यान, रस्ता चुकल्याचं लक्षात येताच या ट्रेनला कल्याणला आणलं गेलं आणि त्यानंतर तिला पुन्हा एकदा मार्गस्थ करण्यात आलं. ही ट्रेन तब्बल 90 मिनिट उशिरानं गोव्याच्या मडगाव स्टेशनला पोहोचली.
महत्त्वाच्या बातम्या –
कला विश्वावर मोठी शोककळा; प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन
फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; वाचा यादी!
पुण्यातील गोपाळकृष्ण विद्यामंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात