Home पुणे ‘वाजले की बारा’ व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम...

‘वाजले की बारा’ व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर

पुणे : ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ या गाण्याने राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या बारामती तालुक्यातील गुनवडी गावच्या बाबजी कांबळे या रिक्षा चालकास आता मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे.

‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी 2 चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. आज चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी बारामतीत येऊन बाबजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.

काही दिवसांपूर्वी ते मालेगाव रस्त्यावर ऑटोमध्ये गॅस भरण्यासाठी गेले असताना लाईट नसल्याने काही वेळ थांबावे लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. मग आपल्या सहकाऱ्यांचं मनोरंजन करण्याच्या हेतूने त्यांनी लावणीवर ठेका धरला. त्यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांचा व्हिडिओ केला. लोकांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर बाबजी कांबळे यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल होऊन हजारो लोकांपर्यंत पोहोचला.

दरम्यान, त्यानंतर निर्माते, दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी बाबजी कांबळे यांची भेट घेत त्यांना आगामी 2 चित्रपटात काम करण्यासंदर्भात करारही केला, असं घनशाम येडे यांनी सांगितलं. थेट चित्रपटात करण्याची संधी मिळाल्यानं बाबजी कांबळे यांनीही आनंद व्यक्त केला आहे. आपण नक्कीच चांगलं काम करुन दाखवू ,असंही कांबळे यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील”

“चंद्रकांत दादा तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडी किती भक्कम आहे हे तुम्हांला कळेल”

अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण; घरीच स्वत:ला केलं क्वारंटाईन

राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास- नितेश राणे