मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन झालं. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत आपला शोक व्यक्त केला.
राजीव सातव यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालं. राजकारणातला देवमाणूस गेला, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राजीव सातव यांना आदरांजली वाहिली. राजीव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वडेट्टीवार हे बोलता बोलता रडायला लागले. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असं त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणं त्यांच्या रक्तात होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचं मार्गदर्शन लाभायचं., असं वडेट्टीवार म्हणायचे.
दरम्यान, दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला, असं म्हणत वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन; पुण्यात सुरू होते उपचार
सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन वाढला; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
“देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस फडणवीसांनी करावं”
पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल