उत्तर प्रदेश पुन्हा बलात्कारानं हादरलं; मेरठमध्ये 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

0
158

लखनाै : उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून देश सावरत नाही तोवरच उत्तरप्रदेशामध्ये आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. मेरठमधील एका आठ वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने बलात्कार केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी मुलीला घराच्या छतावर घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन तो तिथून पळून गेला. दरम्यान आजू-बाजूला राहणाऱ्या लोकांनी मुलीचा आवाज ऐकून आरोपीच्या घराकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. पीडित मुलगी गंभीर अवस्थेत असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र

हाथरस घटनेवर भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत?- इम्तियाज जलील

हाथरस घटनेतील चारही आरोपींना फासावर लटकवायला हवं- रामदास आठवले

“सनरायजर्स हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here