“उत्तरप्रदेश हादरलं! सामुहिक बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार”

0
384

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये सामुहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेवर तेथील एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीटीआयने याबाबतची माहिती दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे ही घटना घडली. जलालाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदनपूर गावात राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेने पत्रकारांना सांगितलं की, 30 नोव्हेंबर रोजी ती आपल्या घरी पायी निघाली होती. यावेळी रस्त्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्यानंतर यातील 5 जणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि ओढत जवळच्या शेतात नेऊन सामुहिक बलात्कार केला.

या प्रकारानंतर पीडित महिलेने जलालाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी या पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरिक्षक उपस्थित होता त्याने तिला त्याच्या खोलीत नेले आणि तिथे बलात्कार केला.

दरम्यान, या दोन्ही धक्कादायक प्रकारानंतरही पीडितेची तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळे तीने थेट बरेलीचे सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची भेट घेतली. त्यानंतर एडीजी चंद्रा यांनी महिलेच्या तक्रारीची चौकशीचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“फ्लिपकार्टने मराठी केलं, आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर बोचरी टीका

राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी; आशिष शेलारांचा टोला

“मोठी बातमी! प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here