आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा आमने सामने आले आहेत. अशात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : “रूपाली पाटील यांच्या राष्ट्रवादीत येण्यानं रूपाली चाकणकर नाराज?”
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. आजही बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. 12 डिसेंबर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पाच वर्ष सत्ता असतानाही महामंडळाची निर्मिती करता आली नाही. या काळात महामंडळ दोनदा रद्द झाले. सत्ता गेल्यानंतरच ऊसतोड कामगारांची आठवण होते., असा टोला धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
दरम्यान, जो जिल्हा सातत्याने दुष्काळ अनुभवत होता, त्या जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. मात्र अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांना 502 कोटी रुपयांची मदत मिळून दिल्याचा दावा धनंजय मुंडेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर सोडायचं नाही”; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना बजावलं
बेस्टच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यापासून सत्ताधाऱ्यांचा पळ; भाजपाचा शिवसेनेवर निशाणा
“माझे महात्मा गांधी फक्त आणि फक्त राज ठाकरे”