शरद पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब- गोपीचंद पडळकर

0
469

पुणे : जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलेलं असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलंय.

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडलं होतं. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं.

महत्वाच्या घडामोडी 

हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

ही माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे- पंकजा मुंडे

हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही; शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here