“जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

0
759

धुळे : राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं म्हणत अब्दुल सत्तारांनी दानवेंना टोला लगावला आहे.

जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं सत्तार म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, सत्तार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचाही समाचार घेतला. राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, असं म्हणत सत्तार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उत्तरप्रदेश हादरलं! सामुहिक बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार”

“फ्लिपकार्टने मराठी केलं, आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर बोचरी टीका

राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी; आशिष शेलारांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here