नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी, असं अमित शहा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मंत्रीपदाची ऑफर होती पण…; स्वाभिमानीच्या ‘या’ आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले…
ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो; शिवसेनेचं राम शिंदेंना प्रत्युत्तर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन
राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस