अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव 365 धावांवर संपला.
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली दुर्दैवीरित्या झेलबाद झाला. त्याच्या झेलबाद होण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
इंग्लंडचा संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना 10 वे षटक अक्षर पटेल टाकत होता. त्याच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिब्लीने चांगला स्वीपचा फटका खेळला. मात्र, त्याने मारलेल्या फटक्यामुळे चेंडू शॉर्ट-लेगला उभ्या असणाऱ्या शुबमन गिलच्या डाव्या पॅडला लागून वर उडाला. त्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंतने हा चेंडू झेलला. त्यामुळे चांगला फटका मारल्यानंतरही सिब्लीला दुर्दैवीरित्या बाद व्हावे लागले.
Poor poor sibley #ENGvIND #SIBLEY pic.twitter.com/x0WLioEj5M
— Prithvi.v.Bharadwaj (@PrithviMatka) March 6, 2021
gill pant partnership catch dismiss sibley #INDvsENG #INDvENG pic.twitter.com/jTP3txaD3E
— Somnath chakraborty ⚽ (@somnath20094585) March 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा आरक्षणासाठी उद्या जालनामध्ये आक्रोश मेळावा”
विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे- संजय राऊत
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा सवाल
“मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण”