“जळगावमध्ये 50 रूपयांच्या उधारीसाठी पुतण्यानं घेतला काकाचा जीव”

0
297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : 50 रुपयांच्या उधारीवरून काका आणि पुतण्याचं भांडण झालं, या भांडणात पुतण्यानं मारहाण केल्यामुळं काकाचा जीव गेलाय. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या कंडारी गावात घडलीये.

हे ही वाचा : आगामी महापालिकांमध्ये मनसेला किंग बनायचंय, किंग मेकर नाही; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

भारत सुकडू भिल असं या घटनेत मृत्यू झालेल्या काकाचं नाव आहे. या घटनेत नेमकं झालं असं की सोमवारी रात्री भारत आणि त्यांचा पुतण्या राजू मानसिंग भिल यांच्यात 50 रुपयांच्या उधारीवरून कडाक्याचं भांडण झालं. भांडणात राजूनं मारहाण करताना भारत यांना जोरात धक्का दिल्यानं ते गटारीत पडले. त्यात डोक्याला मार लागल्यानं मोठा रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अखेर त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी राजू विरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

मुंबईत पर्यटनाला मिळणार चालना, दादर चौपाटीच्या धर्तीवर ‘व्ह्युवींग डेक’ उभारणार- आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here