उद्धवजी Thank You! व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने 7 नगरसेवक पाठवत आहोत, स्वीकार करा- नितेश राणे

0
318

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून गेल्यानंतर वैभववाडी येथील भाजपचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

व्हॅलेन्टाईन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर तिथे उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती शिवसेनेची आहे, असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला, आजही करतो आणि कायम करत राहू. ते आमच्या हृदयात आहेत. मात्र, वैभववाडीत शिवसेनेची परिस्थिती वाईट आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. म्हणून आमचे 7 नगरसेवक व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे, असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी

भाजपाचे नेते आपले संस्कारच दाखवून देत आहेत- रोहित पवार

“या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी”

“राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैव”

हे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार- चित्रा वाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here