Home महाराष्ट्र “उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडबद्दल भाष्य केलं होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट पोस्ट केलं आहे.

टीम इंडिया असं समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे. आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे 80 टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे, असं चंद्रकांत पाटलांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय”

“शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत”

“होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे”