उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा प्रस्ताव बेकायदेशीर- चंद्रकांत पाटील

0
202

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला आहे. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावच बेकायशीर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीनं राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे. त्यात आम्ही कशासाठी पुढाकार घ्यायचा. आमदारकीचा पेचप्रसंग निर्माण होऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल, हे महाविकास आघाडीतीलच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. त्यात आम्हाला कशाला बोट लावता?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

विरोधी पक्षनेत्याचं घर राजभवनाच्या दारात आहे का?; संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्याचा व्हिडीओतून ‘पॉवरफूल’ संदेश

…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here