खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची जुनी सवय; मनसेचा हल्लाबोल

0
453

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र अजूनही प्रत्यक्षात हि गोष्ट घडलेली नाही. मात्र अशातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मी आणि संतोष दुरी यांना 2017 मध्ये मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी आमच्याशी बोलणी केली. आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भाजपाशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला.

हे ही वाचा : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना कार्यालयाला दिली भेट; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, “बाकी मला काही माहिती नाही, मात्र खंजीर खुपसण्याची यांची सवय जुनी आहे एवढं नक्की,” असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 राजसाहेब ते राजसाहेब, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा वाघ लागतो; मनसेचा शिंदेंना टोला

“आम्ही ठाकरेंसोबत; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here