ऋतुजा लटके यांच्या विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मशाल भडकली आणि…

0
291

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. यावर आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मशाल भडकली आणि भगवा फडकला, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. विजयानंतर लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार; नोटाला मिळालेल्या मतांवरून मनसे नेत्याचा भाजपवर निशाणा

मोठी बातमी! अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता; ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here